ठाणे - एटीएम सेंटर म ये ज्येष्ठ नागरिकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यानंतर त्यांना लुबाडणारा मुंब्रा येथील गियासुद्दीन अबू सिद्धीकी २६ आणि शौझान अब्दुल रेहमान आगा २४ या दोघांना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाखांहुन अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विविध कंपनीचे ५५ कार्ड पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ते दोघे सराईत चोरटे असून त्यांच्यावर कुर्ला, कल्याण, भिवंडी,ठाणे येथे ८ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे, मुंबई, नवीमुंबई, पुणे, जयपूर, सोलापूर, कर्नाटक व इतर ठिकाणी एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक केल्याचे २० हुन अधि क गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने केली आहे. कासारवडवली पोलीस ठाणे.
सराईत चोरटे गजाआड, ठाणे शहर पोलिसांची कारवाई