मुंबई : महाराष्ट्र गुटखामुक्त करण्यासाठी आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्यानंतर गुटखाबंदी कडक लागू करण्यासाठी पोली काम करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.गुटखा कंपन्यांच्या मालकांवर व विक्री करणारया सूत्र रांवरच मोक्का लावणार असल्याचेते म्हणाले.गुटखाबंदीसाठी गह विभाग अन्न व औषध प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. २००८ साली मी अन्न व औषध प्रशासन मंत्री असताना गटखाबंदी करण्यात आली होती. त्याची कडक अंमलबजावणीही झाली.त्यामुळे गुटखाकंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ राज्यात आणले जातात. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल कधाकधा हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना क्का लागत नाहीगुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची कडकपणे अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ममोकाफ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन विभागाला पोलिस सहकार्य करतील अशी मी ग्वाही देतो.
गुटखामुक्त महाराष्ट्रासाठी सरकार आक्रमक