संदीप सानप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वसंत सानप (वय ३८,रा.. चिंचवली, सिन्नर, नाशिक) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वसई येथील एका खासगी रुग्णालयात नेत असतानाच शनिवारी (दि. ४) रोजी ही घटना घडली. सानप हे गेल्या २२ जानेवारी २०१९ पासून सफाळे पोलिस ठाण्यात कार्यरत होते.रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर डिव्हिजनम ीिल सर्व पोलिस स्टेशनअंतर्गत सफाळे येथील माकुणसार भागातील मैदानात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतसफाळे, केळवे, मनोर, सातपाटी पोलिस स्टेशन आणि पालघर मुख्यालय मधील प्रत्येकी एक एक संघ याप्रमाणे मैदानावर क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालघर पोलीस उपअधीक्षक देशमुख, पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्यासह सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उपस्थित होते.उद्धाटनाचा सामना सफाळे आणि केळवे पोलिस स्टेशन संघ यांच्यात झाला. या सामान्यात सानप यांनी अत्यंत महत्वाची खेळी करत सफाळे पोलिस स्टेशन संघाला विजय मिळवून दिला. मात्र विजयाचा जल्लोष करीत असताना अचानक सहाय्यक पोलिस निरीक्षक सानप यांचा रक्तदाब वाढला. त्यांना तात्काळ सफाळे येथील पार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रुग्णवाहिकेतून वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र वाटेतच तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.