ठाकरे सरकारची मोठी घोषणा!
मुंबई। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतक-यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.जुलै ते ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोट्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच पार्शवभूमीवर राज्य सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली |आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने हा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. जुलै ते ऑगस्ट २०१९ राज्यात अवकाळी पाऊस | झाला होता. या पावसामध्ये शेतकरयांचं मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यागेलं होतं. त्याच शेतक-यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, शेतक-यांसाठी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.