शहरात १० मुलांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा

 



भिवंडी शहरात १० मुलांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा भिवंडी: भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एकाच दिवसात विविध ठिकाणी १० शाळकरी मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना शहरातील अन्सारनगर, खंडूपाडा, पटेलनगर या परिसरात घडल्या आहेत. कुर्त्यांनी हैदोस घातल्यामुळे शाळकरी मुलांसह पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा यंत्रणेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. __ मात्र, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महानगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहितीदेखील यानिमित्ताने समोर आली आहे. __ अहमद, माहेनूर खान, अकरम इब्राहिम, हसनैन, रब्बानी, हुजैफा, अय्यब अन्सारी, यश चन्ने आदी शाळकरी मुलांसह १० मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेऊन त्यांना जखमी केले आहे. हया नामक मुलीच्या चेहऱ्यावर आणि माहेनूरच्या गळ्यावर कुत्रा चावल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्वावर प्रथम (पान ३वर)