कल्याण, डोंबिवलीयाशहरांतील वाहनतळांचा प्रश्न नवीन वर्षांत सुटण्याची शक्यता!


डोंबिवली : अरुंद रस्ते, भरमसाट वाहने आणि अपुरे वाहनतळ | यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या कल्याण, डोंबिवली या |शहरांतील वाहनतळांचा प्रश्न नवीन वर्षात सुटप्याचीशक्यता आहेकल्याण-डोंबिवली महापालिकेने एकूण अडीच हजार वाहने एका | वेळी उभी करता येतील, इतके वाहनतळ शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्याचे धोरण आखले असून हे वाहनतळ विशेष यंत्रणेद्वारे |जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोबाइल |अॅपवरूनदेखील नजीकचे वाहनतळ आणि तेथे उपलब्ध असलेल्या | जागेची माहिती मिळू शकणार आहे. | कल्याण रेल्वे स्थानक परिसर, टिटवाळा मंदिर आणि | खडकपाडा या ठिकाणी असलेल्या पार्कि गच्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अडीच हजार वाहने उभी राहतील अशी व्यवस्था केली जात आहे. या कामासाठी पाच लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. याद्वारे पार्किंग व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रणेद्वारे मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पार्किगची ठिकाणे शोधणे, पार्किंगसाठी जागेची नोंद करणे आणि पार्किंगसाठीचे शुल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.