ठाणे ग्रामीण मधील विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी | रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हयातील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, सोनसाखळी, कर्णफुले, ब्रेसलेट, कानाच्या रिंगा, झुमके आणि इतर) | तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे सव्वा कोटीचा | मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.
यावेळी मौल्यवान मंगळसूत्रां सह मौल्यवान दागिने, मोबाईल, मोटार सायकली आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. अंबरनाथ येथील कुळगाव येथील रहिवाशी असेलेले सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट सनी थॉमस यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. थॉमस यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपली सेवा बजावल्याने त्यांना चांगल्या कामगिरीबद्दलची सेवा पदके मिळाली होती. त्यांच्याकडे झालेल्या या मौल्यवान पदकांसह दोन लाखांची रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात उघडकीस आणली होती. या प्रकरणात नवी मुंबईतून तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील पदकांसह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. पण निवृत्तीनंतर मिळालेली दोन लाखांची जमा पुंजी समाजकार्या साठी उपयोगात आणायची होती. शिवाय भारत पाक सीमेमवर बजावलेल्या कर्तव्यापोटी केंद्र सरकारकडून मिळालेले पदक हीच एक मोठी संपत्ती होती. तीही चोरी झाली होती. ती पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या पथकाचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस मेहनत घेऊन गुन्हा कसा उघडकीस आणतात याचा चांगला अनुभव आल्याचे सांगतांनाच त्यांना गहिवरुन आले. तसेच (पान ३वर)