मुंबई-रेड सिग्नल असतानाही हॉर्न वाजवणाऱ्या वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी भन्नाट आयडियाशोधून काढली आहे. दरम्यान, याची जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एकव्हीडिओ तयार केला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशीआहे मुंबई पोलिसांची भन्नाट आयडियासिग्नल लाल असताना वाहनचालकाने हॉर्न वाजवला आणि त्याच्या आवाजाच्या पातळीने ८५डेसीबलचीपातळी ओलांडली तर सिग्नल आणखी काही मिनिटे लाल राहील. सिग्नल लाल राहिल्याने त्याच्यासह अन्य वाहनचालकांचा आणखी खोळंबा होईल. हा खोळंबा हीच बेशिस्त चालकांसाठी शिक्षा असेल. हा प्रयोग करण्यापूर्वी त्याबद्दल वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येईल. हॉर्नचा त्रास पादचारी, आसपासची वसाहत, रुग्णालये आणि शाळांना किती आणि कसा होतो, याची जाणीव वाहनचालकांना या प्रयोगातून व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल
मुंबई पोलिसांनी दिले वाहनचालकांना शिस्तीचे धडे