मुंबई : महाराष्ट्र गुटखामुक्त करण्यासाठी आरोपींवर मोक्का लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्यानंतर गुटखाबंदी कडक लागू करण्यासाठी पोली काम करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी सांगितले.गुटखा कंपन्यांच्या मालकांवर व विक्री करणारया सूत्र रांवरच मोक्का लावणार असल्याचेते म्हणाले.गुटखाबंदीसाठी गह विभाग अन्न व औषध प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. २००८ साली मी अन्न व औषध प्रशासन मंत्री असताना गटखाबंदी करण्यात आली होती. त्याची कडक अंमलबजावणीही झाली.त्यामुळे गुटखाकंपन्या राज्याबाहेर गेल्या. __ अलिकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरुन मोठ्या प्रमाणावर गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ राज्यात आणले जातात. त्यांची राज्यात साठवणूक होते. कधीकधी हा माल कधाकधा हा माल पकडलाही जातो व वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना ६ क्का लागत नाही. गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची कडकपणे अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ममोकाफ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन विभागाला पोलिस सहकार्य करतील अशी मी ग्वाही देतो.
गुटखामुक्त महाराष्ट्रासाठी सरकार आक्रमक