आरक्षण सोडत १८ फेब्र रोजी नगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर

अंबरनाथ : राज्यभरातील आठ नगरपालिकांसह, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणकांच्या आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनांचा कार्यक्रम अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २७ जानेवारी रोजी होणारा प्रभागरचनांचा कार्यक्रम ऐनवेळी निवडणूक आयोगाने रद्द केला होता. त्यामुळे दोन्हीशहरांतील इच्छुकांमध ये संघम वाढला. अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण आणि प्रभाग रचनांचा राज्यभरातील आठ नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर केला. १८ फेब्रुवारी रोजी अंबरनाथ, बदलापूर नगर पालिकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. नगरपालिकांच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या २०११ च्या जनगणने नुसार आरक्षणासह जिल्हाधि एकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयुक्तांकडे मुख्याधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करायचा आहे. तसेच मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयुक्त १५फेब्रुवारीपर्यंत मान्यता देणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी आरक्षणाच्या सोडतीकरता जिल्हाधिकारी नोटीस प्रसिद्ध करणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. २० ते २६ फेब्रवारीपर्यंत आरक्षण सोडतीवर हरकती मागवल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या हरकतींवर २९ फेब्रवारी रोजी सनावणी घेतली जाणार आहे.