उल्हासनगर : रुग्णमित्र व शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे कल्याण लोकसभा अध्यक्ष भरत खरे यांचा गेल्या वर्षी खड्यात पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी शिवसेनेचे पुढाकार घेतला आहे. महापालिकेतील २५ नगरसेवक आपल एक महिन्याचा पगार देणार असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर देखील या मदतयज्ञात हातभार लावणार आहेत.
गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी भरत खरे हे रुग्णांच्या मदतीसाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात स्कटीवरून जात होते. उल्हासनगरा तील फॉरवर्ड लाईन येथे असलेल्या खड्यामळे ते खाली पडले. त्यांच्या मेंदूला मार लागून ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत केली, भरत खरे यांच्या मृत्यूचे पडसाद महासभेत उमटले होते. त्यांच्या परिवाराला पाच लाख रुपये निधी देण्याचा ठराव मंजर केला होता. मात्र अशी तरतूद नाही, असे सांगत तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांनी फेटाळला होता. अखेर शिवसेनेचे माजी नगरसेवक व अन्यायविरोधी संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर यांनी खरे यांच्या कुटुंबीयांसाठी सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.खरे यांच्या पत्नी निशा यांना आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी सहकार्य केले. तसेच महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक १५ फेब्रुवारी रोजी एक महिन्याचे मान न देणार असल्याचे आश्वासन शहरप्रमुख व सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी दिले आहे.