भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अतिदुर्गम आसलेल्या एक साल सांगाव येथील शाळेला प्रेरणा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नुकतेच वॉटर फिल्टर भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आली आसून नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राजू भांगरे याच्या हस्ते देण्यात आले आहे. | सामाजिक कार्यकर्ते राजू भांगरे यानी प्रेरणा फाउंडेशन ही सामाजिक आणि प्रबोधात्मक संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून ते भिवंडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत आसतात तालुक्यातील दुर्गम भागातील एकसाल - सांगाव येथील शाळेतील विद्यार्थी पिण्याचे शुध्द पाण्यापासून वचित आहे ही बाब त्याच्या निर्देशनास येताच त्यांनी शाळांमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थांन करीता वॉटर फिल्टर शाळेला भेट दिले आसून येथील गोरगरीब आदिवासी मुलांना दरवर्षी शाळा प्रवेश वेळीच प्रेरणा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असेही त्यांनी याप्रसंगी आपल्या सागितले आहे, या कार्यक्रमाला प्रेरणा फाउंडेशन राजेंद्र भांगरे, उपसंरपच, यतिष पाटील किरण आहिरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता कुसूम देशमुख, विश्वनाथ पाटील दिनेश पाटील, हितेशठाकरे, शरद बागूल आदीसह गावातील आनेक मान्यवर तसेच शिक्षक वृदं विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते
भिवंडीतील अतिदुर्गम भागातील सागाव येथील शाळेला प्रेरणा फाऊंडेशनतर्फे वॉटर फिल्टर भेट