: शिक्षणमंत्री मुंबई महानगरपालिका पाठोपाठ आता राज्याचा शालेय शिक्षण विभागही आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्याशाळाराज्यभर सुरू करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनीच ही माहिती दिली. एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्याची भाषा करणाऱ्या सरकारने इंग्रजीबोर्डाच्याशाळा राज्यभर उघडणे म्हणजे मराठीशाळांसाठी आणि मायबोलीच्या शिक्षणासाठी मृत्यूची घंटाच ठरणार असून, हा निर्णय मोठा वाद निर्माण करण्याची चिन्हे आहेत.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचे जे कारण दिले त्यातून मराठीशाळांची घटणारी पटसंख्या, त्यातून अतिरिक्त ठरणारे शिक्षक आणि त्यावर तोडगा म्हणजे या इंग्रजी बोर्डाच्या शाळा सुरू करणे आणि त्यासाठी या अतिरिक्त शिक्षकांना प्रशिक्षण देणे, असा शिक्षण विभागाचा अजेंडा स्पष्ट झाला.प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, सध्या इंग्रजी माध्यमांकडे पालक आणि विद्यार्थयांचा कल आहे. त्यामुळे शहरी शाळांमधील विद्यार्थयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये त्यांच्या बदल्या कराव्या लागत आहेत. बाहेरच्या बोर्डामुळे मराठीशाळा आणि विद्यार्थी संख्या कमी होवूलागल्याने शिक्षणक्षेत्राम ये चिंता पसरली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग सुद्धा आईसीएसई व सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करणार आहे.राज्यातील विविध शाळांमध्ये सध्या जुन्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जात आहे. राज्याबाहेरील सर्वच शिक्षण संस्थामध्ये आईसीएसई आणि सीबीएसई अभ्यासक्रम आहे. सध्याचे युग स्पर्धेचे असल्यामुळे राज्यातील मुलांचा त्यांच्यासमोर निभाव लागत नाही. राज्यातून बोटावर मोजण्याइतकीच मुले स्पर्धेत यशस्वी होतात. त्यामुळे मुंबई महापालिकेनंतर राज्य सरकार सुद्धा आईसीएसई व सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करेल, असे कारणही त्यांनी दिले.
आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा राज्यभर उघडणार