आता सेवानिवृत्ती व्यक्तींना हयातीचा दाखला भरण्यानवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वा खालील सरकारने सेवानिवृत्ती धारकांसाठी (पेन्शनर) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सेवानिवृत्ती व्यक्तींना निवृत्ती वेतन (पेन्शन) चालू ठेवण्यासाठी वर्षातून एकदा द्यावा लागणारा हयातीचा दाखलाभरण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेनेच पेन्शनरांच्या घरी जाऊन या दाखल्यावर त्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यासाठी नाममात्र शुल्क द्यावे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी ६० रुपये इतके नाममात्र शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. सर्व सेवानिवृत्तांना वर्षातून एकदा नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखल द्यावा लागतो. त्यासाठी ज्या बँक शाखेतून पेन्शनचे वितरण होते. तिथे जाणे बंधनकारक असते. तिथेजाऊन संबंधित कागदांवर सेवानिवृत्तांना स्वाक्षरी करावी लागते. अनेक सेवानिवृत्त हे वयाने थकल्यामुळे घरातून बाहेर पडत नाही. त्यांच्यासाठी हा दाखला देणे त्रासाचे काम होऊन बसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. साठी बँकेत जाण्याची गरज नाही
आता सेवानिवृत्ती व्यक्तींना हयातीचा दाखला भरण्या