__ शिक्षणाचा हेतू म्हणजे जन्माला आलेल्या मुलाला चांगला नागरिक व समाजोपयोगी व्यक्तिमत्त्व बनवणे हा असतोय पण ही बाब कुठे दिसत नाही. उद्याच्या जगात पालकांच्या छत्रछायेखालून बाहेर पडून स्वतंत्रपणे | जबाबदारी घ्यायला सज्ज असलेला तरुण घडवणे ही शालेय शिक्षणाची प्राथमिक भूमिका आहे. त्यातला अभ्यास वा परीक्षा ही त्याची कितपत तयारी झाली आहे, त्याची कसोटी असतेय पण तयारीपेक्षा त्याला आता| प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा म्हणायची वेळ आली आहे. याचा एकत्रित | परिणाम निराशाग्रस्त तरुणांची फौज निर्माण करण्यात होत आहे. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय समजते, त्याचाही आवाका त्या मुलांना आलेला नसतो. अशा स्थितीत लक्षावधी मुले शालांत परीक्षा उत्तीर्ण होतात, त्यामुळे आपण आता नोकरी-धंदा करायला लायक झालो, अशी त्यांची समजूत झालेली असते. परिणामी, लाखोंच्या संख्येने आपल्या समाजात साक्षार निरुपयोगी फौज निर्माण करण्यापलीकडे शालेय शिक्षणाला अर्थ उरलेला नाही. कारण, शाळा ही आता शिक्षणाची मंदिरे वगैरे राहिली नसन, काही लोकांसाठी रोजगाराचा कारखाना, तर काही लोकांसाठी पैसे कमावण्याचा उद्योग झाला आहे. त्यात मुलांचे भवितव्य घडवणे किंवा देशाची भावी उज्ज्वल पिढी घडवणे अशा गोष्टी | कुठल्या कुठे विस्मृतीत गेल्या आहेतय पण कोणाला वास्तविक त्यात लक्ष घालण्याची गरज वाटलेली नाही.
संपर्काची साधने वाढली असल्याने व जग त्यातून जवळ आलेले असल्याने हल्ली पालकांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. आपल्या चार-सहा पिढ्यांनी जितका पल्ला गाठला नसेल, तितका आपल्या पाल्याने एकाच पिढीत गाठावा, असे प्रत्येक पालकाला वाटू लागले आहे. सहाजिकच, त्यांना तसे स्वप्न दाखवणारे व्यापारी, दुकानदारही अस्तित्वात आलेले आहेत. त्यांनी शिक्षणाची दुकाने उघडली आहेत आणि अधिकाहि कि सोपी व सहज गाठता येणारी स्वप्नेही शोकेसमध्ये सजवलेली आहेत. मात्र, तिथे पोहोचण्यासाठी पैशांची किंमत मोजावी लागते आहे. त्यातून मग इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्यापासून नामांकित शाळेत मुलांना प्रवेश मिळवण्यापर्यंत नानाविध मार्ग चोखाळले जात असतात. त्यांच्याकडे आशाळभूतपणे बघणारे बाकीचे पालक तशीच स्वप्ने साकारात, त्याची अभिलाषा धरू लागतात. यामध्ये मुलांचे बालपण पुरते हरवून गेले आहे. शिकवण्यांची दुकाने जोरात आहेत आणि घरचा अभ्यास वाढला आहे. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझेही वाढले आहे. शिकणे म्हणजे ज्ञान आत्मसात करण्याची गरजही संपून गेली आहे. प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने परीक्षाभिमुख शिक्षणाचा गाडा चालला आहे. सहाजिकच, विषयात चांगले गुण मिळवणारा विद्यार्थीसुद्धा त्याच विषयावर प्रभुत्व मिळवलेला असतो, असे मानता येत नाही. राष्ट्रीय पातळीवर होणान्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील मुले त्यामुळे मागे पडताना दिसतात. शालेय जीवनातील स्पर्धा संपवली गेली असेल, तर त्या मुलांनी महत्त्वाकांक्षी स्वप्ने बघायचीय पण त्यासाठी त्यांना तयार करण्याची कुठली सोय नाही, अशी वास्तविक स्थिती आहे. त्यामुळेच एकूण शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन गेला आहे. मुले हुशार करण्याची गरज नाही. त्यांना विषयांची तोंडओळख करून देणे आणि कुठलाही विषय आत्मसात करायचा सराव घडवून आणणे, असे शालेय शिक्षणाचे मूलभूत तत्त्व आहे. त्याचाच विसर पडल्याचा हा दुष्परिणाम आहे. अधिकाधिक मुले पास होणे दुय्यम, त्यांच्यात शिकण्याची प्रवृत्ती जोपासणे अगत्याचे आहे. त्यासाठी आवडीने शिकवणारे शिक्षक आणि आवडू शकणारा अभ्यासकम याला प्राधान्य असायला हवे. असा विचार हवा आणि तसे ॥ गरण आखण्याची गरज आहे, तेव्हाच अशा समस्यांवर मात करता येईल.