कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची बदली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची | सरकारने बदली केली असून, त्यांच्या जागी डॉ. विजय सूर्यवंशी यांची | नियुक्ती झाली आहे. बोडके यांची बदली ही नैमित्तिक आहे. सूर्यवंशी हे | रायगडचे जिल्हाधिकारी असून, ते कधी पदभार स्वीकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेच्याआयुक्तपदाचा पदभार बोडके यांनी १९ मार्च २०१८ ला घेतला होता.त्यापूर्वी बोडके हे सरकारच्या मत्स्य विभागात कार्यरत होते. तेभारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळून आयुक्त झाले होते. महसूल विभागाचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे महापालिकेचा कारभार तेप्रथमच हाकत होते. महापालिकेत बोडके यांनी एक वर्ष, ११ महिने काम पाहिले.मात्र, त्यांनी महापालिकेचा पदभार घेतल्यावर आधारवाडी डम्पिंगची समस्या सोडवू, असे म्हटले होते. मात्र, कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. डम्पिंग ग्राउंड तेबंद करू शकले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले| होते. दरम्यान, बोडके यांच्या आधी काम पाहणारे (पाान ३वर)