पनवेलमध्ये खवल्या मांजराची तस्करी करणारा पोलिसांच्या अटकेत

पनवेल : आडसूडगाव येथे खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यास खांडेश्वर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. यावेळी तस्करी करणाऱ्या तरुणासह एक टाटा सुमो पोलिसांनी ताब्यात घेतली. यावेळी आरोपीकडे सात किलो ३६० | ग्रॅम वजन असणारे खवल्या मांजर सापडले. ___ खांडेश्वर पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे एक इसम आसूडगाव येथे खवल्या मांजराची तस्करी करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खांडेश्वर पोलिसांनी आसूडगाव येथे सापळा रचून आरोपी कल्पेश गणपत जाधव (वय २८) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ लाल रंगाच्या टाटा सुमो या वाहनात मध्ये खवल्या मांजर ठेवण्यात आल्याचे आढळून आले. ___ खवल्या मांजराचे वजन किमान सात किलो ३६० ग्रॅम असे येवढे आहे. आरोपीला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने हे खवल्या मांजर तस्करी करीताआणले असल्याचे कबुली | दिली. खवल्या जातीचे मांजर जवळ बाळगणे धनदौलत, ऐश्वर्य | वाढते असा लोकांचा गैरसमज आहे. या अंधश्रद्धेपोटी या वन्य प्राण्यांची तस्करी व विक्री होत असते. यास आळा घालण्यासाठी कारवाई होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास खांदेश्वर पोलिस स्टेशन करत आहे.